ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री!! 128 वर्षांनंतर चाहत्यांसाठी खुशखबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला  ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

याबाबतची माहिती देत आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी म्हटले आहे की, कार्यकारी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोससह क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावाला स्वीकारले आहे. या सर्व खेळांना 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये स्थान दिले जाईल. शुक्रवारी, मुंबईमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने रंगणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे शेवटचे सामने खेळले गेले होते. गेल्या अनेक काळापासून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज या प्रयत्नांना यश आले आहे.  आता 2028 मध्ये अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे क्रिकेट सामने पाहता येणार आहेत.