IND vs SA 2nd T20 : तिकीट विक्रीवरून महिलांमध्ये मारामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

IND vs SA 2nd T20
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 (IND vs SA 2nd T20) मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीमध्ये पार पडला. आता 12 जून रोजी दुसरा सामना (IND vs SA 2nd T20) कटकमध्ये होणार आहे. कोरोना काळात ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकले नाहीत, त्या ठिकाणी हि मालिका (IND vs SA 2nd T20) खेळवण्यात येणार आहे. यामुळे तिकीट विक्रीला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

कटकमध्ये रविवारी होणाऱ्या सामन्याची तिकीटं खरेदी करण्यासाठी फॅन्सनी जोरदार गर्दी केली होती. ही गर्दी इतकी वाढली की नंतर महिलांमध्ये तिकीट विक्रीवरून हाणामारी झाली. यानंतर पोलिसांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गुरूवारी बाराबती स्टेडिअमच्या (IND vs SA 2nd T20) बाहेर कडक उन्हात तिकीट खरेदीसाठी मोठी रांग लागली होती. यावेळी काही महिला ही रांग मोडून पुढे आल्या. त्यानंतर गोंधळ सुरू झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके ?
काऊंटरवर उपलब्ध असलेल्या 12 हजार तिकीटांच्या खरेदीसाठी सुमारे 40 हजार नागरिक स्टेडिअम बाहेर उपस्थित होते. ही तिकीट विक्री सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. कटकमध्ये जवळजवळ अडीच वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना (IND vs SA 2nd T20) होत आहे. यापूर्वी या ठिकाणी डिसेंबर 2019 मध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे सामना झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हे पण वाचा :
4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने जमावाकडून नराधमाला बेदम मारहाण

बुलेट मिळाली : महाराष्ट्र केसरी “पृथ्वीराजला” छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रदान

कौतुकास्पद ! कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड

kotak mahindra bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले