व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात; दीड तासात 143 आमदारांनी केले मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्ब्ल 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही आमदार विधानभवन परिसरात दाखल झाले. सर्वात प्रथम शिवसेना आमदार संजय पवार हे विधानभवनात दाखल झाले. त्यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दाखल झाले.

मतदानाच्या सुरुवातीस शिवसेनेच्या आमदारांकडून मतदान करण्यात आले. त्यांच्या बरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

‘मविआ’च्या मतांची अशी आहे विभाजनी

कॉंग्रेसकडे जी 44 मतं आहे यापैकी 42 मतं आपल्या उमेदवाराला देईल, त्यानंतरची उरलेली 2 मतं ही राखून ठेवण्यात येईल. राष्ट्रवादीकडे 53 मतं आहेत यातील पहिली 42 मतं ते प्रफुल्ल पटेल यांना देणार असून 9 मतं राखून ठेवणार आहे. तर शिवसेनेकडील 56 मतांपैकी अगोदर 42 मतदार मतदान करणार आहे. तर उरलेली मतं ही राखून ठेवण्यात येणार आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘हे’ आहेत सात उमेदवार

प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजपा), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजपा)