‘…तर मी पुढील IPL खेळणार नाही’, सुरेश रैनाची मोठी घोषणा

0
49
Dhoni And Raina
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपाीएलच्या पुढील सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या अगोदरच चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने मोठी घोषणा केली आहे. त्याने सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामध्येच स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता उर्वरित आयपीएल यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. ‘माझ्याकडे चार-पाच वर्ष बाकी आहेत. आम्ही यावर्षी आयपीएल खेळत आहोत. पुढील सिझनमध्ये आणखी दोन टीम आयपीएलमध्ये वाढणार आहेत. मी पुढच्या सिझनमध्येही सीएसकेकडून खेळेल अशी मला आशा आहे.’ असे सुरेश रैना एका कर्यक्रमादरम्यान म्हणाला.

… तर मी खेळणार नाही
‘धोनी भाई पुढील सिझन खेळणार नसतील तर मी देखील खेळणार नाही. आम्ही 2008 पासून सीएसकेकडून खेळत आहोत. या सिझनमध्ये आम्ही जिंकलो तर मी त्याला पुढच्या सिझनमध्येही खेळ असे सांगेल. त्याने मला पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. तो खेळला नाही तर मी दुसऱ्या आयपीएल टीमकडून खेळेल असे मला वाटत नाही’ असे सुरेश रैनाने स्पष्ट केले आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. चेन्नईसाठी मागचा सिझन निराशाजनक ठरला होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. पण या सिझनमध्ये चेन्नईने कमबॅक केले आहे. यंदाची आयपीएल स्थगित होण्यापूर्वी चेन्नईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आणि यामध्ये विशेष म्हणजे त्यानंतर काही वेळातच सुरेश रैनानेसुद्धा निवृत्ती जाहीर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here