‘हे’लज्जास्पद कृत्य केल्याने पीसीबीने उमर अकमलवर घातली तीन वर्षाची बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज विकेटकीपर फलंदाज उमर अकमलला क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमध्ये खेळण्यास तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीसीबीने त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्यामागील कारणांचा खुलासा केलेला नाही परंतु त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात दोन प्रकरणात बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम २.४.४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोरमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी येथे सुनावणी झाली आणि सुनावणीदरम्यान सोशल डिस्टंसिंग आणि उर्वरित सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले.

पीसीबीने सोमवारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर उमरच्या बंदीची माहिती दिली. पीसीबीच्या मीडिया विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, “न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) फजल ए. मीरन चौहान यांच्या अध्यक्षतेखालील शिस्त पालन समितीने क्रिकेटच्या सर्व प्रकारात उमर अकमलवर तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे”.

PCB suspends Umar Akmal pending anti-corruption investigation ...

पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्यापूर्वी उमर अकमलला निलंबित करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे उमर अकमलने स्वत: ला निर्दोषही म्हटले आहे. उमर काही काळापूर्वी म्हणाला होता की तो पार्ट्यांमध्ये अनेक लोकांशी संवाद साधतो, बरेच लोक त्याच्याबरोबर फोटोही काढतात पण तो सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही.

 ओमरने अखेरचा सामना ऑक्टोबरमध्ये खेळला होता. त्याने १६ कसोटी, १२१ एकदिवसीय, ८४ टी -२० सामने खेळून अनुक्रमे १००३, ३१९४,१६९० धावा केल्या आहेत. आपल्या कारकीर्दीची प्रभावीपणे सुरुवात करणारा अकमल अनेकदा प्रशासकांवर टीका करीत असत. फिटनेस टेस्ट दरम्यान त्याने फेब्रुवारीमध्ये लाहोरमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमीमध्ये प्रशिक्षकाशी गैरवर्तन केल्याचा आरोपही केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment