हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटपट क्रिकेटच्या युगात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने नुकतेच एक मोठे विधान केले आहे. कसोटी क्रिकेट लोकप्रिय आणि जिवंत ठेवण्यासाठी दर्जेदार खेळपट्ट्या असणे महत्वाचे आहे, असे नासिर हुसेन याचे मत आहे.
स्टार स्पोर्ट्स प्रोग्राम क्रिकेट कनेक्टमध्ये हुसेन म्हणाला, “मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर सपाट खेळपट्ट्या असतील जशा काही वर्षापूर्वी केंब्रिजमध्ये होत्या तितक्या सपाट खेळपट्ट्या असतील ज्यावर जेम्स अँडरसनने ६०० चेंडूंचा सामना करून ९० धावा केल्या होत्या अशा खेळपट्ट्यावर खेळ कंटाळवाणा आणि जुनाट वाटतो. “
तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमधून असे दिवस गेलेच पाहिजेत.पहिल्या डावात खेळ रोमांचित होण्यासाठी आपल्याला ३०० धावा फटकावाव्याच लागतात, त्या खेळपट्टीवर चेंडूदेखील आपले अस्तित्व दाखवत असेल तर प्रेक्षकांसाठीही हे सर्व रोमांचक आहे.त्यांना तिकिटांचे संपूर्ण पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळेल आणि इंग्लंडमध्ये तर तसेही कसोटीची तिकिटे स्वस्त नाहीत. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.