टीम इंडियाला मोठा धक्का ! Rohit Sharmaला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि निर्णायक टेस्ट 1 जुलै रोजी होणार आहे. त्याअगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याची रॅपीड अँटीजन टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवूव आहे.

टीम इंडियाला धक्का
भारतीय टीम 1 जूलैपासून इंग्लंड विरूद्ध टेस्ट मॅच खेळणार आहे. टीमचा नियमित ओपनर केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर आलेला नाही. त्यातच रोहितला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या धोक्यामुळेच इंग्लंड दौऱ्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट स्थगित करावी लागली होती.

रोहितनं (Rohit Sharma) गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले होते. त्यानं चार मॅचमध्ये एका शतकासह 368 रन केले. त्याची सरासरी 52.27 होती. टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 नं पुढे आहे. 2007 साली भारतीय टीमनं इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी स्पिनर आर. अश्विन आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते बरे झाले असून पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

Leave a Comment