Cricket World Cup 2027 | 2023 चा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने प्रचंड मेहनत केली होती. त्यात त्यांनी सलग 10 सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह सर्वच भारतीयांचे स्वप्न तुटले. हा वर्ल्डकप भारतात होता त्यामुळे काहीही करून आपण जिंकणारच असा विश्वास चाहत्यांना होता. आता पुढचा वर्ल्ड कप जिंकू असा असं चाहते म्हणत असले तरी ते काय सोप्प काम नाही. कारण पुढची विश्वचषक स्पर्धा 2027 मध्ये होणार असून ती दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात होणार आहे. आता या वर्ल्ड कप स्पर्धेचे स्वरूप कसे असेल ते जाणून घेऊयात.
2027 विश्वचषक स्पर्धा 3 देशात होणार – Cricket World Cup 2027
येणारा 2027 चा क्रिकेट वर्ल्डकप हा एकूण तीन देशात होणार आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांचा समावेश आहे. हा 14 वा वर्ल्डकप असणार आहे. तसेच 2003 च्या विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विश्वचषक स्पर्धेचे दुसऱ्यांदा संयुक्त यजमान असतील तर नमिबियाच्या धर्तीवर पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळाला जाईल. त्यामुळे हा वर्ल्डकप नमिबिया क्रिकेटच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
2027 च्या वर्ल्डकप मध्ये असतील 14 संघ
यावर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघाचा समावेश होता. परंतु या पुढच्या म्हणजेच 2027 च्या वर्ल्डकप मध्ये (Cricket World Cup 2027) एकूण 14 संघ खेळतील. त्यामुळे एकूण 54 सामने होतील. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हे सामने होणार आहेत. तसेच ICC क्रमवारीत सुरुवातीचे १० संघ विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र क्वालिफाय होतील. तर इतर चार टीम निवडीसाठी क्वालिफाय स्पर्धा होणार आहे.
असे होतील सामने
2027 साली होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेचे (Cricket World Cup 2027) स्वरूप हे एकूण 14 संघांचे असणार आहे. त्यासाठी दोन गट केले जातील. त्यामध्ये सात संघाचा एक गट आणि सात संघचा एक गट असे हे स्वरूप असेल. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या तीन संघ सुपर सिक्स साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल सामना खेळवला जाणार आहे.