मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज भंगले आहे. भारताला न्यूझीलंडने सेमी फायनल सामन्यात पराभूत केले आहे. काल पडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. परंतु प्रथम क्रमांकावर असणाऱ्या भारताला पराभव का पत्करावा लागला याची काहि विशेष आणि काही क्षुल्लक कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे,
खराब हवामान
इंग्लंडचे हवामान या वेळीच्या विश्वचषक सामन्यासाठी पोषक नव्हते. त्यामुळे भारताला निसर्गाचा बळीठरावे लागले आहे. भारत न्यूझीलंड सामना आज मँचेस्टर मध्ये खेळला गेला. खर तर आजचा सामना म्हणजे कालच्या सामन्याचा दुसरा अध्याय होता. पहिला अध्याय पहाता दुसऱ्या आध्ययाची भारताने कल्पना देखील नव्हती केली. मात्र भारत खराब हवामानाचा बळी ठरला आहे.
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; करणार शिवसेनेत प्रवेश
गाफील खेळाडू
मँचेस्टरचे मैदान फलंदाजीसाठी चांगले नाही. हे माहित असताना देखील भारताच्या फलंदाजांनी याची काळजी घेतली नाही. भारताची सेमी फायनलमध्ये एवढी दुरावस्था होईल हे कोणी स्वप्नात देखील पहिले नव्हते. मात्र ५ धावांवर ३ विकेट हा खेळ करून भारताच्या फलंदाजांनी कुप्रसिद्धिचा नवा विक्रमच नोंदवला आहे. त्यामुळे आज भारताचे खेळाडू विजयाच्या उन्मादात गाफील राहिले त्यामुळे ते विश्वचषकातून बाहेर पडले.
बाहेरून आलेल्यांनी मला शिवसेनेची निष्ठा शिकवू नये ; अशा बुचकेंचा आढळरावांवर घणाघात
दोन दिवस चाललेला सेमी फायनलचा सामना
मँचेस्टरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भारताचा न्यूझीलंड सोबतचा सामना दोन दिवस चालला. सामनाच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड खेळले तर दुसऱ्या दिवशी भारत खेळला. पहिल्या दिवशी भारत चांगला खेळल्याने दुसऱ्या दिवशी देखील निश्चिन्त राहिला. यातच न्यूझीलंडने डाव साधला आणि भारताला मात दिली.
हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा
कंकुवत पडलेले नेतृत्व
कोहलीने आजच्या दिवशीची रणनीती व्यवस्थित नआखल्याने भारताला पराभूत व्हावे लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारताची मुसद्दीगिरी कमी पडल्याने भारताच्या एकानंतर एक खेळाडू बाद होत गेले. परिणामी भारत २४० धावांची तुलनेने कमी असणारी धावसंख्या गाठू शकला नाही.