मँचेस्टर | भारताने २४० रणावर न्युझीलंडचा खेळ गुंडाळला खरा मात्र भारताच्या फलंदाजीची पहिल्या पाच षटकातच पुरती वाट लागली आहे. कारण भारताचे पट्टीचे खेळाडू पहिल्या पाच षटकातच तंबूत परतले. तर भारताच्या अवघ्या ५ धावांवरच ३ विकेट पडल्याने भारताच्या फायनलमध्ये जाण्याच्या महत्वाकांक्षेवर देखील आभाळाप्रमाणे सावट आले आहे.
मँचेस्टरचे मैदान हे बॉलरला साथ देणारे आहे. त्यामुळेच न्यूझीलंड काल खेळ करू शकली नाही. तसेच भारताची स्थिती देखील न्यूझीलंडपेक्षा वेगळी नाही. कारण भारतापुढे देखील न्यूझीलंडने ठेवलेले २४० धावांचे लक्ष भेदण्याचे मोठे आव्हान आहे. न्यूझीलंडचा हेंड्रि हा बॉलर आजच्या सामन्यात चांगलाच प्रकटला आहे. कारण त्याच्या बॉलिंगचीच शिकार भारतीय संघ होत असल्याचे चित्र सध्या सामन्यात आहे. कारण त्याने एकट्यानेच चार विकेट घेतलय आहेत.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या २४ धावांवर ४ विकेट पडल्या होत्या. शेवटचा बाद झालेला खेळाडू हा दिनेश कार्तिक होता. त्याने अवघ्या ६ धावा काढून चेंडू झेल झाल्याने बाद झाला.