Wednesday, February 1, 2023

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला हा अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती परंतु दुखापतीचे कारण देत रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी वगळण्यात आले होता. रोहितला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

रोहित शर्मा 11 नोव्हेंबरला भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. मात्र, 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रोहितचा संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत रोहित शर्मा दुखापतीतून बरा होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

रोहित सध्या आयपीएल मध्ये व्यस्त असून रोहितच्या नेतृत्वाखाली त्याचा मुंबईचा संघ अंतिम सामन्यात पोचला असून आयपीएल चषक जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली तेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे अनफिट असल्याचे कारण देत त्याला वगळ्यात आले. परंतु रोहित शर्मा आयपीएलच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला होता. यावरुन बीसीसीआय आणि निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’