अखेर ‘त्या’ प्रकरणावर युवराज सिंगने मागितली माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दोन दिवसांपासून सोशल मीडियावर युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवराज सिंग लाइव्ह चॅटमध्ये रोहित शर्माशी बोलत असताना त्याने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची खिल्ली उडवताना एक जातीवाचक उल्लेख केला. युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याने सोशल मीडियावर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता. तसेच, हरयाणामध्ये युवराजवर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर युवराज घडलेल्या प्रकाराबद्दल आता माफी मागितली आहे.

युवराजने एक ट्विटरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आपण जर कोणाला दुखावले असेल तर त्याची सपशेल माफी मागत असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये युवराजने सांगितले की, ” रंग, धर्म, पंथ किंवा लिंग यामध्ये आतापर्यंत मी कोणताच भेदभाव केलेला नाही. लोकांसाठी मी आतापर्यंत झटत आलो आहे. त्यामुळे कोणत्याही असमानतेवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो.”अशा आशयाचा माफीनामा त्याने ट्विट केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि वकिल असलेल्या रजत कलसन यांनी हरियाणातील हांसी येथील पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. कलसन हे दलित अधिकाराचे कार्यकर्ते आहेत. कलसन यांनी युवराजविरोधात तक्रार दाखल करत, जातीय तेढ वाढवल्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळ आता युवराजला खरं अटक होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष होते. पण त्यापूर्वीच आता युवराजने आपली बाजू मांडली आणि त्याबाबत ट्विटरवर माफी मागितली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment