हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यावरुन महाविकासआघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता आम आदमी पक्षाने (आप) उडी घेतली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांनी केली आहे.
रेमडिसिवीरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजपा रेमडिसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा आप पक्ष निषेध करतो. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की, भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा यांना भेटून आले. या करता त्यांनी रेमडिसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला. तीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्म यांच्याकडून रेमडिसिवीरचा स्टॉक विकत घेतला. राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशनला रजिस्टर असतात, चॅरिटी कमिशनला नाही. कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषधं विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे प्रिती शर्मा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
.@Dev_Fadnavis claims @BJP4Maharashtra bought remdisvir to donate to Maha govt.@ECISVEEP must take cognizance, a political party cannot do charity, it is not registered with Charity Comm but with EC. Its downright illegal. https://t.co/Mm471F5WWV
— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) April 18, 2021
आपल्या संविधानात आणि प्रतिनिधीक नागरिक कायदा 1951 यामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की राजकीय पक्ष चॅरिटी करू शकत नाही. दुसरं म्हणजे ज्या प्रकारचं अत्यंत हीन दर्जाचं राजकारण राज्य सरकारविरूद्ध करतयं ते पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीरची खरेदी करणं याचा हेतू नागरिकांना मदत करण्याचा नसून त्याचा पुरवठा करण्याचाच असावा.
देवेंद्र फडणवीसांनी हे उघडपणे म्हटलं की भाजपा ने रेमडिसिवीर हे औषध चॅरिटी साठी खरेदी केलं. आणि म्हणूनच त्यांच्यावर, भाजपावर आणि त्यांच्या कार्यालयीन सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात द्यायलाच हवेत, अशी मागणी प्रिती शर्मा यांनी केली आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजपच्या नेत्यांना खास वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रिती शर्मा यांनी केला. सामान्य नागरिकांना पोलिसांकडून भीतीची वागणूक मिळत असताना भाजपा नेत्यांना मात्र खास वागणूक का दिली गेली? यावर्षीच्या सुरूवातीला मी डीसीपी उपाध्याय यांच्याशी भेटण्याचा. प्रयत्न केला. त्यांनी मला वाट पहायला सांगितले. आणि नंतर त्यांच्या कार्यालयाद्वारे मला माझा फोन बाहेर ठेवून त्यांना भेटण्यासाठी सांगण्यात आले. जेव्हा मी हे करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात यायला परवानगी दिली नाही. मी या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली पण कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, राज्यातील भाजप नेते खासगी मिटिंगसुद्ध फोनमध्ये रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येते. मुंबई पोलीस प्रत्येक नागरिकांना समान पद्धतीने वागणूक देत नाही, असा सवाल प्रिती शर्मा यांनी उपस्थित केला.