साताऱ्यात गणेश मिरवणूक काढल्याने 22 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यावर बंदी घातली असातना भाजी मंडई गणेश उत्सव मंडळाच्या मंडईचा राजाच्या भक्तांनी वाजत – गाजत गुलालाची उधळत करत गणपतीची मिरवणूक काढली. प्रशासनाच्या मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने गणेश मंडळा विरूध्द गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

या गणेश मंडळा विरूध्द गुन्हा दाखल झाला असून, मंडळातील 22 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेश पागडे, अमोल हादगे, शंभूराज साळुंखे, किरण साळुंखे, ईश्वर साळुंखे, रोहित शिंदे, पराग निवळे यांच्यासह एकूण 22 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मंडल अधिकारी जयंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोरोनामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीला बंदी आहे. साताऱ्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्री गस्त घालत असताना मिरवणूक निघाल्याचे या पथकाला समजले. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गणेश भक्तांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अटी व नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.