सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात दहशतीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. चाकूचा धाक दाखवून लुटमारही केली जात आहे. दरम्यान, बुधवारी सायंकळच्या सुमारास सातारा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाटील वडापाव येथे दोन गटात राडा झाला. यावेळी कोयत्याचा वापरही करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून मारेकरी फरार झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी नेहमीप्रमाणे सातारा शहरातील गुरुवार परज आणि पोलीस स्टेशन नजीक असलेल्या पाटील वडापाव येथे वडापाव विक्री सुरू होती. यावेळी त्या ठिकाणी शहरातील दोन गटातील युवक एकत्रित आले. यावेळी दोन्ही गटातील काही युवकांच्या मधे सुरुवातील शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर नंतर मारामारीत झाले.
साताऱ्यात पुन्हा कोयत्याचा थरार; 2 जण जखमी; मारेकरी फरार pic.twitter.com/fMiTAf88yL
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 5, 2023
यावेळी काही युवकांनी कोयतेही बाहेर काढले. यावेळी मारामारीत 2 जण जखमी झाले. मारामारी नंतर युवक तेथून पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत युवक तेथून पळून गेले होते. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे काहीकाळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.