Crime News : पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातून दीड लाखाची रोकड पळवली; रात्री दुकानाचे शटर लावत होता मालक अन तितक्यात…

crime News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी (Satara News) : सातारा शहरात रात्री पिस्तुलाचा धाक दाखवून कापडाच्या दुकानातून दीड लाख लुटल्याची घटना घडली आहे. अजंठा चौकात ही घटना घडली असून साताऱ्यातील व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा काम आटपून दुकान मालक शटर लावत असताना तितक्यात तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला लुबाडले. (Crime News)

दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी दुकानात प्रवेश करून दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवत पैशाची मागणी केली. गल्ल्यातील सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे रहिमतपूर रस्त्याच्या दिशेने पसार झाले. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सातारा पोलीस दाखल झाल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी देखील स्वतःभेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली रात्री सातारा शहरातील बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती.