हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Crime News । प्रेमात माणूस कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही, प्रेमात माणूस इतका अखंड बुडतो कि त्याला आपल्या जवळच्या लोकांचेही भान नसते. प्रेमात अनेकांचा जीव गेल्याच्या घटनाही आपण ऐकल्या असतील. असच एक हादरवणारे हत्याकांड उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. एका मुलाने मुस्लिम तरुणीशी आंतरधर्मीय लग्न केलं. परंतु घरच्यांनी त्याला विरोध केला. त्या मुस्लिम सुनेला स्वीकारण्यास नकार दिला आणि उलट तू घटस्फोट घे असा तगादा मुलाकडे लावला. नाईलाजाने त्याने घटस्फोट घेतला खरा, पण काही दिवसांतच त्याने आई वडिलांची निर्घृण हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले.
नेमकं काय घडलं? Crime News
दिवस होता १३ डिसेंबर… वंदना नावाची एक तरुणी जौनपूरमधील जाफराबाद पोलिस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांना कळवले की तिचे पालक, ६५ वर्षीय श्याम बहादूर आणि ६३ वर्षीय बबिता, जे अहमदपूर गावात राहतात, ते अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. एवढच नव्हे तर तिचा भाऊ अंबेश देखील गायब आहे. शेवटच्या वेळी तिने तिच्या भावाशी बोलले तेव्हा त्याने तिला सांगितले होते की त्याचे आई वडील कुठेतरी गेले आहेत आणि त्यांचा शोध घेत आहेत. परंतु , तेव्हापासून तिच्या भावाचाही पत्ता लागला नाही. प्रकरणाची माहिती मिळताच, जौनपूर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले आणि या संपूर्ण प्रकारची सखोल चौकशी केली असता हादरवणारी बातमी समोर आली. अंबेशनेच जन्मदात्या आईवडिलांची हत्या केली होती…कारण ठरलं ते म्हणजे आंतरधर्मीय विवाह…
अंबेश हा कोलकाता येथे राहत होता. कोविड-१९ साथीच्या काळात अंबेशने तिथे एका मुस्लिम महिलेशी लग्न केले. त्यांना दोन मुले सुद्धा आहेत. तेव्हापासून तो त्याच्या दोन मुलांसह आणि पत्नीसह कोलकाता येथे राहत होता. परंतु अंबेशने मुस्लिम मुलीशी केलेलं लग्न त्याच्या आईवडिलांना मान्य नव्हते. अंबेशने घटस्फोट घ्यावा यासाठी ते सातत्याने त्याच्यावर दबाव टाकायचे… अंबेश घटस्फोटाला तयार नव्हता, परंतु अखेर नाईलाजाने त्याला बायकोसोबत घटस्फोट घ्यावा लागला. मात्र यासाठी ५ लाख लागणार होते.
८ डिसेंबरला अंबेशने वडिलांकडे पैसे मागितले. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावेळी अंबेश आणि त्याच्या आईमध्ये मारहाण झाली. यादरम्यान रागाच्या भरात अंबेशने लोखंडी रॉडने आईच्या डोक्यावर वार केला. आई खाली कोसळली अन् तडफडू लागली. हे पाहताच अंबेशचे वडीलही घाबरले. त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगत असतानाच अंबेशने वडिलांच्या डोक्यावरही रॉड घातला. या हल्ल्यात आई वडील दोघेही ठार झाले. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर (Crime News) अंबेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले.हे सर्व तुकडे गोणीत भरले आणि बेलाव पुलावरुन मृतदेह नदीत फेकला. यानंतर तो घरी निघून आला. या संपूर्ण घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे.




