शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेल मधील चार ते पाच मुलींचा खेळाच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई नसलेल्या एका पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. सदर शिक्षका विरोधात वारंवार विनयभंगाच्या तक्रारी शाळा व्यवस्थापनाकडे करूनही केवळ शाळेची बदनामी होईल या कारणामुळे शाळा व्यवस्थापन या शिक्षकावर काहीही कारवाई करत नसल्याने या शिक्षकाची हिम्मत वाढतच गेल्याने त्याने अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र शनिवारी घडलेल्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट पोलिस ठाण्यातच या शिक्षका विरोधात तक्रार केली. पोलिसांनी देखील सुरवातीला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने पालकांनी माध्यमांना बोलवत हा सर्व प्रकार समोर आणला

पालकांचा आक्रमक पावित्रा आणि घडलेल्या प्रकाराची माहिती माध्यमांना मिळाल्याच समजताच नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी संशयित शिक्षक एम एस करपे यांच्या विरोधात अखेर रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=8E56vw3xk6g&w=560&h=315]