तासगाव बसस्थानकामध्ये तरुणांची रंग खेळत हुल्लडबाजी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना तासगाव पोलिसांनी घडवली अद्दल

सांगली प्रतिनिधी

तासगाव येथील बसस्थानकामध्ये रंगपंचमी खेळताना हुल्लडपणा करत प्रवाशांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या दहा महाविद्यालयीन तरुणांवर तासगाव पोलिसांनी आज कारवाई करत चांगलीच अद्दल घडवली. युवकांना ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले.

अधिक माहिती अशी की, सकाळी साडे दहाच्या सुमारास काही महाविद्यालयातील तरुण तासगाव शहरातील विविध भागांमधून रंगाची पोती हातात घेऊन एकमेकांच्या अंगावर रंग टाकत आरडा ओरडा करत हुल्लडपणा करत होते. बसस्थानकांमध्ये तर त्यांच्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. बस स्थानक भरून रंगाचा सडा पडला होता.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाने तात्काळ धाव घेत या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. तर पोलीस स्टेशनमध्ये सर्वाना नेत समज देत कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईच्या भीतीने अनेकांनी पळ काढला. या घटनेने बस स्टॅन्ड जवळील प्रवासी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात हुल्लडबाजीवर वचक बसण्याची शक्यता आहे.