गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

बोरी बिटा लगत प्राणहीता नदी पात्रात दोन ते अडीच लाखाचे अवैध्य सागवान जप्त करण्यात आले. गुप्त माहीती च्या आधारे उपविभागिय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी सदरील कारवाई केली असून यामुळे अवैध्य वृक्ष तोड करणार्‍यांचे धाबे दनानले आहेत. आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरी बिठात सदरील प्रकार घडला.

शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान हि कारवाही करण्यात आली. बोरी बिठातील आेड्डीगुडम येथील प्राणहीता नदी पात्रात वनविभागाचे उपविभागीय वनधिकारी नितेश शकंर देवगडे यांच्या नेतृत्वात गुप्त माहीती च्या आधारे धडक कार्यवाही मध्ये दोन ते अडीच लक्ष किंमतीचे चार नग मोठमोठे साग लाकूड जप्त करण्यात आले.

बोरी बिटा मधील अवैध वृक्षतोडीचे प्रकरण समोर आल्या नंतर सदर भागात मोठ्या प्रमाणावर गस्त वाढण्यात आली असून मुकभीरांचे मोठे जाळे निर्माण करत कार्यवाही चा फास वाढवीण्यात आला आहे. सदर प्रकरणात अनेक मोठे मासे वनविभागाच्या गळाला लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत.
आज केलेल्या कार्यवाही मध्ये आलापल्ली चे क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, रामाराव देवकते क्षेत्र सहाय्यक झिमेला, आलापल्लु परिक्षेत्राचे वनरक्षक धनजंय कुमरे, काशीनाथ टेकाम व वाहन चालक नानाजी सोयाम सहभागी होते.
[youtube https://www.youtube.com/watch?v=uvqjTI_EjdM&w=560&h=315]