जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आंतकवाद – जितेंन्द्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आतंकवाद आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विटर वरुन जेएनयू हिंसाचाराचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारला याबाबत जाब विचारला आहे.

रविवारी रात्री जेएनयू कॅम्पसमध्ये चेहरा झाकलेल्या गुंडांनी हिंसाचार करत प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांना मारहाण केली. सदर गुंडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असल्याचा आरोप सध्या होत असून त्याचा तपास सुरु आहे. जेएनयू हिंसाचार हा शहा प्रेरित असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला याबाबत जबाबदार धरले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठिंब्यावरच सदर हिंसा झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. पण एक गोष्ट एेकुन छान वाटले की मोदी शहा कशाला घाबरत असतील तर ते जेएनयू मधीप बुद्धिमत्तेला घाबरतात असंही आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Comment