उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे.

षण्मुख देशमुख हे पुण्याचे रहिवासी आहेत. तर ते नागपूर खंडपीठात कार्यरत आहेत. ३१ मे रोजी त्यांचा उपवास होता. उपवास सोडण्यासाठी त्यांनी झोमॅटोवरून पनीर बटर मसाला या डीशची ऑर्डर दिली होती. ही डीश पुण्यातील हिंजेवाडी येथील प्रीत पंजाबी स्वाद या हॉटेलमधून आली होती. डिलीव्हरी मिळाली आणि बिल दिल्यानंतर काही वेळाने त्यांनी घरच्या नोकराला जेवण वाढण्यासाठी सांगितलं. जेवायला बसल्यानंतर ही डीश पनीर नसून बटर चिकन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पुन्हा झोमॅटोवरून पनीर बटर मसाल्याची ऑर्डर दिली. मात्र, दुसऱ्या वेळीही त्याच हॉटेलकडून पनीर ऐवजी बटर चिकनची डिलीव्हरी करण्यात आली.

झोमॅटोकडून झालेल्या अशा प्रकाराने संतप्त झालेल्या षण्मुख देशमुखय्यानी ग्राहक न्यायालयात फसवुणकीचे ५लाख नुकसान भरपाई आणि १ लाख मानसिक छळाची भरपाई द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर ग्राहक आपल्याला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. झोमॅटो फक्त डिलेव्हरी करण्याचे काम करते. या सेवेत कसूर झाला हि सर्वस्वी हॉटेलची चूक आहे असे झोमॅटोने कोर्टात सांगितले. त्यावर कोर्टाने हॉटेल आणि झोमॅटो यांच्यात झालेला करार तपासला त्यानंतर झोमॅटो देखील या झाल्या प्रकारात दोषी असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्यायालने नायायालने झोमॅटो आणि संबधित हॉटेल मालकाला ५० हजार दंड आणि ५ हजार मानहानी आणि मानसिक छळाची नुकसान भरपाई देण्याचे सुनावले.