पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित  

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला आज विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. पीएमएलए कोर्टाने हा निकाल दिला आहे. तसेच नीरव मोदी यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. निरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

उन्नाव मध्येहैदराबादची पुनरावृत्ती; बलात्कार पीडितेला पेटून देण्याचा प्रयत्न

यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं.

अखेर ३ वर्षीय आराध्याची प्राणज्योत मालवली; ६ दिवसांपासून सुरु होते उपचार

आराध्या हि घरातील अंगणामध्ये खेळत होती. त्यांच्या घरासमोर सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवत खाली ठेवले. आणि घरातील इतर कामे ती करु लागली

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा गंडा; ३ कोटी लंपास

बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान  या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे. 

वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह , सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर खराब असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल आहे . असे सांगून बिल कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक 1 व 2 यांनी तक्रारदारकडे दिनांक 30/11/2019 रोजी 20, 000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 18,000 ₹ लाचेची मागणी करून सदर लाच आज दि .4/12/19 रोजी आरोपी लोकसेवक क्रमांक 1 वायरमन धनंजय कानडे यांनी पंचासमक्ष मंगळ बाजारात तक्रारदाराच्या दुकानाजवळ

औरंगाबादमध्ये ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना राजकीय पुढाऱ्याला अटक

शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.

धुळे शहरात चोरीचे सत्र सुरूच ; शेतकऱ्याच्या घरातून हजारोंचा माल लंपास

शहरात गेल्या महिन्या भरापासुन चोरी सञ सुरुच आहे . बंद घरांना लक्ष करुन चोरटे हात साफ करत आहेत . शहरातील मोहाडी उपनगरातील बि.एस.एन. ऑफिसच्या पाठिमागे असलेल्या शिवानंद कॉलनीतील फ्लॅट नं.8 मध्ये राहणारे व्यवसायाने शेतकरी असलेले सुरेश नथ्थु हिरे काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. याच दोन दिवसा दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन

एसटी बसने विद्यार्थ्याला चिरडले; बस चालकाचा पोबारा

मागून येणाऱ्या एसटी बसने या मुलाला धडक दिली. या धडकेत मुलगा बस खाली चिरडला गेल्याचे लक्षात येताच बस चालकाने  पोबारा केला आहे.

कंडोम बाळगा, बलात्काऱ्यांना सहकार्य करा; चित्रपट निर्मात्याचे वादग्रस्त विधान

दाक्षिणात्य चित्रपट निर्माता डेनियल श्रवण यांच्या एका सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे’

नक्षल्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

अबुझमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नक्षलवादी प्रशिक्षण तळ उध्दवस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले होते. यावेळी मोठया प्रमाणावर नक्षल साहित्य तसेच दस्तऐवज हस्तगत करण्यात आले होते. मिळालेल्या दस्तऐवजावरुन काल गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाच्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. या रस्त्यावर नक्षलवादयांनी घातपाताच्या दृष्टीने पुरुन ठेवलेले अंदाजे १५ कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन मिळुन आले.