अल्पवयीन अनाथ मामेबहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

आत्येभावाकडून अल्पवयीन असणाऱ्या अनाथ मामे बहिणीवर नशेच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्या प्रकरणी कुपवाड येथील एकास दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आज जिल्हा न्यायाधीश व सहाय्यक सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी सुनावली. सचिन वसंत कांबळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान शिक्षा कमी होण्यासाठी आरोपीने न्यायालयाकडे शिक्षेमध्ये माफी मिळावी अशी न्यायालयाकडे विनंती केली, न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावली.

मिळालेल्या माहितीनुसार , मौजे दत्तनगर बामणोली येथे आई वडिलांचे निधन झाल्याने पीडित मुलगी हि आत्याकडे राहते. १० जून २०१७ रोजी पीडित मुलीच्या आत्याने नवीन बांधलेल्या घराला रंग देण्याचे काम आरोपीला दिले होते. पीडित मुलीची आत्या हि नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्ताने जयसिंगपूर येथे पतीसह गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी हि घरामध्ये एकटीच होती. याचा गैर फायदा घेत आरोपिने घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा अत्याचार करत याची कोठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर पुन्हा १३ जून २०१७ रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला व पीडित मुलीस जबरदस्तीने नशेच्या गोळ्या देऊन तिला बेशुद्ध करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपी हा पीडित मुलीच्या तोंडावर पाणी मारून उठवत असताना त्याच वेळी पीडित मुलीचे मामा घरी आल्यानंतर आरोपी पळून गेला. पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर नातेवाईकांनी विचारणा केली असता आरोपीने केलेल्या दुष्कृत्याचा पाढाच वाचला. त्यानंतर पीडित मुलीला कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी सहाय्यक सत्र न्यायाधीश श्री. पेरमपल्ली यांच्या न्यायालयात सुरु होती. या गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पीडित मुलगी, फिर्यादी, इतर साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी पुराव्या अभावी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Leave a Comment