नगरमध्ये युवकाने कंटाळून दुचाकी पेटवली..कारण ऐकून थक्क व्हाल..

0
66
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शोरूमच्या फालतुगिरीला कंटाळून संतप्त युवकाचे कृत्य

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर येथील राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून घेतलेल्या गाडीचे इंजिन बदलून न दिल्याचा राग आल्याने संतप्त युवकाने शोरुमसमोरच नगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना आज घडली. प्रमोद सुदाम निर्मळ (वय २७, रा.पुणतांबा) या युवकाने दोन महिन्यापूर्वी राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून होंडा कंपनीची मोटारसायकल रोख रक्कम भरुन घेतली होती. या गाडीचे पासिंग होऊन गाडीला एम.एच.-१७, सी.एफ.-९५६८ गाडी नंबर मिळाला होता.

दरम्यानच्या काळात गाडीच्या इंजिनमधून आवाज येत असल्याने या युवकाने चार वेळा शोरुममध्ये येऊन गाडीचे काम करुन नेल्यानंतरही इंजीनमधून आवाज येत होता. या युवकाने या गाडीचे इंजिन बदलून द्या, अशी मागणी केली. मात्र त्यास शोरुम व्यवस्थापकाने प्रतिसाद न दिल्याने या युवकाला राग अनावर झाला.

प्रमोदने बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घेतलेली गाडी शोरुम समोरील नगर-मनमाड रोडवर गाडी उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिली. या घटनेनंतर या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली होती. राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग विझविण्यात आली. तोपर्यत मोटारसायकल पूर्णपणे खाक झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here