अटकेच्या भितीने गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न; ब्लेडने स्वतःच्या शरीरावर केले वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीस पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गेले असता अटकेपासून सुटका करण्यासाठी संशयिताने ब्लेडने स्वतःच्या शरीरावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदरचा प्रकार हा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस दीपक गट्टे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित मधुकर गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी रोहितवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संशयित रोहित गोसावी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक रेकॉर्डवरील पाहिजे असलेला गोसावी याचा शोध घेत होते. त्यावेळी शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गोसावी हा मारुती रोडवरील पंचशील साडी दुकानासमोर असल्याचे समजले.

त्यावेळी स्थानिक गुन्हे नावेशनचे दीपक गट्टे यांच्यासह पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याने त्याच्या हातात असलेले ब्लेड काढून मानेवर, हातावर, डोक्यावर आणि दंडावर स्वतःच वार करून घेत जखमी होत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment