सांगली । जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोटे याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार गुन्हेगार धनाजी मोटे याच्यावर अनेक गुन्हे जिल्ह्यात व जत पोलीस ठाण्यात दाखल आहेत. धनाजी मोटे याचे गावातील एका मुलीशी अनैतिक सबंध होते. या कारणातून मुलीच्या घरच्या लोकांमध्ये व धनाजी मोटे यांच्यात सारखे वाद होत होते. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात धनाजी मोटे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. सतत मुलीशी छळ काढत असल्याने घरच्यांनी त्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री गावातील आंबेडकर समाज मंदिरासमोर भर चौकात गुन्हेगार धनाजी मोटे याला अडवून गोळ्या झाडून व डोक्यावर दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला.
घटनास्थळी एक गावठी पिस्तुल चार, बंदुकीच्या गोळ्या मिळून आल्या आहेत. हे पिस्तुल नेमकं आरोपीची का मयताच हे पोलिसांच्या तपासात स्पस्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच जतचे डिवायएसपी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणी केली. या प्रकरणी प्रकरणी मयतचा भाऊ संदीप मोटे याने नामदेव भीमा लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे यांच्या विरोधात जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’