हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |एन्काउंटरच्या भितीने उत्तर प्रदेशमधील एक गँगस्टर पोलिसांना शरण आला आहे. या गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं. उत्तर प्रदेशमधील संबळमध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि पोलिसांच्या पाया पडू लागला. तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती.
हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. या आरोपीवर पोलिसांनी 15 हजार रुपयांचं बक्षीसही ठेवलं होतं.
मी चुकीचे काम केले आहे. मला संभळ पोलिसांची भीती वाटते. मी माझी चूक स्वीकारतो. अशा परिस्थितीत मी आत्मसमर्पण करत आहे. माझ्यावर गोळीबार करू नका, असे या गुन्हेगाराने आपल्या गळ्यात अडकविलेल्या पाटीवर लिहिले होते. या गुन्हेगाराला पोलिसांनी आता ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने गुन्हेगारांविषयी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुंडांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
विशेषत: पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे गुंडांमध्ये एन्काऊंटर होण्याची भीती आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशातील गुन्हेगार एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या नाहीत. परंतु कायदा व सुव्यवस्थेची भीती नक्कीच गुंडांच्या मनात निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’