आयपीएलवर दहशतवादाचे संकट? वानखेडे स्टेडियमची रेकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल स्पर्धेला अवघे 2 दिवस बाकी असतानाच आता आयपीएल स्पर्धे दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे समजते. त्यामुळे मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे.

दहशतवाद्यांकडून वानखेडे मैदानाची रेकी करण्यात आल्याचे समजते. तसेच आयपीएल खेळाडुंचा मुक्काम असलेल्या ट्रायडंट हॉटेलच्या परिसराचीही दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे.

ATS ला मिळालेल्या माहितीनुसार सर्व स्टेडिअम तसेच खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांच्या विशेष टीमला तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.