औरंगाबाद | मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असणारा म्हणजे रमजान ईद या सणाच्या दिवशी देखील महानगरपालिकाने सफाई कर्मचाऱ्यांना मानधन व अँडव्हान्स देखील देण्यात नाही . आज भर सणाच्या दिवशी या सफाई कामगारांवर कर्ज काढून ईद साजरी करण्याची वेळ आली आहे. सफाई कर्मचारी दररोज सायंकाळी पाच वाजता उठून लोकांच्या घरी जाऊन कचरा उचलण्याचे काम करतात.
साफसफाई करण्याचे काम करतात आणि याच कर्मचाऱ्यांना आता मानधनापासून वंचित राहून ईद साजरी करावा लागत आहे. आमच्या रिपोर्टर ने काही सफाई कर्मचाऱ्यांची बोलताना असे लक्षात आले की दिवाळी व 14 एप्रिलला सर्व कर्मचाऱ्यांना अँडव्हान्स देण्यात आला होता. आमचा सर्वात मोठा सण म्हणजेच रमजान ईदच्या वेळी मात्र आम्हाला महानगरपालिकाने कुठलाही ॲडव्हान्स किंवा आमचा पगार देण्यात आलेला नाही. मग आम्ही ईद कशी साजरी करायची असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे