व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बाहेरून आलेल्यांनी मला शिवसेनेची निष्ठा शिकवू नये ; अशा बुचकेंचा आढळरावांवर घणाघात

जुन्नर प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतरयाचा कडता काढण्यासाठी शिवसेनेने अशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर अशा बुचके यांनी आज पुन्हा नव्याने आढळराव पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. त्याच प्रमाणे आपण १८ वर्षे शिवसेनेचे एकनिष्ठेने काम केले आहे. मी बाळासाहेबांची कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला निष्ठा काय असते हे शिकवू नये असे नाव नघेता अशा बुचके यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

दोन्ही बाहेरून आलेले नेते पुणे जिल्ह्यातील शिवसेना संपुष्ठात आणणार आहेत. त्यामुळे पक्ष पक्ष प्रमुखांनी या लोकांकडे व्यवस्थित लक्ष ठेवले पाहिजे असे अशा बुचके यांनी म्हणले आहे. त्याचं प्रमाणे त्यांनी त्यांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचा पाढाच वाचून काढला आहे. तसेच आढळराव पाटील हे बाहेरून आलेले नेते आहेत हे सांगायला अशा बुचके कधीच विसरल्या नाहीत.

आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हकालपट्टी मनावर घेतली असून मी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढणार आहे. निवडणूक लढूनच अशा बुचके नेमकी कोण व्यक्ती आहे हे दाखवून देणार आहे असे अशा बुचके म्हणाले आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचा अशा बुचके यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याबद्दल देखील त्यांनी त्यांच्या भावना माध्यमात व्यक्त केल्या आहेत.

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला