कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
नागरणी संपवून बैलाना वारणा नदीच्या पात्रात पाणी पाजणेस गेलेल्या तरूण शेतकऱ्यावर मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी बैलाचे कासरे हाताला गुंडाळले असल्याने मोठ्या ताकतीने बैलाने पात्राबाहेर आणल्याने मालकाचे प्राण वाचले. कोल्हापूरमधील सातवे ता.पन्हाळा येथील महेश सर्जेराव काटे (२४) असे या तरूण शेतकऱ्याचे नाव असून कोडोली येथील यशवंत धर्माथ रुग्णालयात त्याचेवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
महेशसह अन्य सहकारी शेतकरी नांगरटीसाठी वारणा नदीकाठी वाण्याच्या मळीत गेले होते. दुपारी १२ ला काम संपवून दोन बैल जोडीला पाणी पाजणेस नदीपात्रात नेले यातील तीन बैल परत बाहेर आले तर एका बैलास महेश पाणी दाखवत असताना या बैलाला तीन मगरीने तर महेशला एका मगरीने घेरले.
बैलाची दावी हाताला गुंडाळली होती मगरीचा हल्ला चुकवत मालक महेश याला बैलाने बाहेर काढले तथापि मगरीने महेशच्या डाव्या पायाचा ताबा घेतला होता मगरीचे तीन दात हाडापर्यंत जोरदार घुसले. जखमी महेशवर रूग्णालयात योग्य उपचार सुरू आहेत. वन विभागाचे अधिकारी रूग्णालयात महेशची भेट घेतली असून कोडोली पोलिसांना देखील कळवण्यात आले आहे. बैलामुळेच मालकाचे प्राण वाचल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.