लॉकडाउन संपताच औरंगाबाद रेल्वेस्टेशन ला गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. दोन दिवस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी कोरोनाची कोणतीही तमा बाळगली नाही. नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात दिसून आले.

कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी व शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केले. दोन दिवस या लॉक डाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाउन संपताच आज सकाळी रेल्वेने आलेल्या प्रवाशांकडून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. तसेच शहरात देखील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

दूध, भाजीपाला, मेडिकल आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दोन दिवस सुरू होती.तरी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले नाही. शहरातील सर्वच रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली. दोन दिवसाच्या कड़क लॉकडाऊननंतर शहरात जनजीवन सुरू झाले आहे. आज लॉकडाऊन संपल्या नंतर रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी कोरोनाची कोणतीही तमा न बाळगता मोठ्या संख्येने गर्दी केली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment