रेल्वे प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! आता ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी वाचा ‘ही’ मार्गदर्शक तत्त्वे, अन्यथा नुकसान सोसावे लागेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus Pandemic) थांबलेली रेल्वेसेवा आता हळूहळू पुन्हा रुळावर येत आहे. रेल्वे सेवा (Train Service) सुरू होताच प्रवाश्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. मात्र, पुन्हा कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा सल्ला भारतीय रेल्वे लोकांना देत आहे. आता सोमवारी रेल्वे मंत्रालयाच्या एका ट्विटद्वारे कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

रेल्वेने काय म्हटले ते जाणून घ्या?
रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railway) आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,”# COVID19 च्या दृष्टीने प्रवाशांना प्रवासापूर्वी विविध राज्यांनी दिलेली हेल्थ अडवायझरी वाचण्याची विनंती केली जाते. कोरोनाचा नवा स्ट्रेन देशातील बर्‍याच राज्यांत पसरतो आहे, त्यानंतर आता अनेक राज्यात पुन्हा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू केला गेला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेत आहे. अलीकडेच, पूर्व मध्य रेल्वेने दिल्ली-मुंबई ते बिहारकडे जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी विशेष अडवायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की,” मुंबई किंवा बिहारच्या इतर राज्यांतून होळीला येण्याऱ्या सर्व प्रवाश्यांचे केवळ थर्मल स्कॅनिंगच करू नये तर सर्व प्रवाशांना मस्क घालणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

प्रवासापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
या ट्विटमध्ये असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाश्यांनी ज्या राज्यात ते जात आहेत तिकडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे वाचन केले पाहिजे. यावेळी प्रत्येक राज्यात राज्य सरकारकडून वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यात प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक केलेले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाबरोबर एकत्र लढण्यासाठी हे केले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment