कराड तालुक्यातील कार्वे येथील CRPF जवान वैभव थोरात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

0
91
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जम्मू-काश्मीर येथे उरी सीमेवर कर्तव्य बजावताना CRPF जवान वैभव थोरात यांनी आतंकवाद्याना कंठस्नान घालून पराक्रमाची शर्थ गाजवली. भारत पाकिस्तान मधील सर्वात संवेदनशील समजल्या जाणार्या उरी बोर्डर वर आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या युनिट मधील जवानांसोबत मध्यरात्री घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आतंकवाद्यांना गोळ्या घालून जाग्यावरच ठार केले आणि आपले देशसेवेचे कर्तव्य चोख पार पाडले.

शूरवीरांच्या सातारा जिल्यातील कार्वे (कराड) गावाचे रहिवासी जवान वैभव थोरात यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स च्या 82 व्या वर्धापन दिना दिवशी शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक आणि मेडेल देऊन सन्मानित करण्यात आले. आपले वडील लान्स नायक कै.शंकर रामराव थोरात यांच्याप्रमाने देशसेवेची ओढ असल्याने ते 2005 मध्ये CRPF भरती झाले होते. तेव्हा पासून ते देशसेवा करत आहेत.

23 सप्टेंबर 2017 रोजी रात्री 12.30 वाजता CRPF च्या 53 बटालियन च्या तुकडीला उरी सेक्टर मधील कलगई गावामध्ये पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेले तीन आतंकवादी लपून बसल्याची बातमी मिळाली. आपल्या बाटालीयनच्या हत्यारांनी सज्ज टीम सोबत जवान वैभव थोरात यांनी मध्य रात्री ऑपरेशन राबवून त्या एरियाला घेराबंधी करत आतंकवादी लपले असलेल्या जागेवर छापा मारला आणि आतंकवाद्याना यमसदनी पाठविले. त्याच्या या वीर पराक्रमाबद्दल त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना राष्ट्रपती पुरस्कार आणि पुलिस मेडल ने सन्मानित करण्यात आले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here