Cryptocurrency Price :क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण, सर्व मोठ्या कॉईन्सच्या किंमतीत झाली घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | शुक्रवार, 1 एप्रिल रोजी सकाळी 9:42 पर्यंत, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तब्बल 4.82% घट झाली आहे. गेल्या 24 तासात ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.05 ट्रिलियन पर्यंत घसरले आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीज 4 टक्क्यांहून अधिकने घसरल्या आहेत. टॉप क्रिप्टोकरन्सीबाबत बोलायचे झाल्यास, शिबा इनू मध्ये जवळजवळ 10 टक्के घट झाली आहे.

Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 5.21% खाली $44,661.14 वर ट्रेड करत आहे, तर Ethereum ची किंमत त्याच कालावधीत $3,254.39 वर 4.38% खाली आहे. ही बातमी लिहिताना, Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.4% आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.1% आहे.

कोण-कोणते कॉईन घसरले ?
-Shiba Inu) – प्राइस: $0.00002521, घसरण : 9.33%
-Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1351, घसरण : 6.74%
-Terra – LUNA – प्राइस: $100.31, घसरण : 6.35%
-Cardano – ADA – प्राइस: $1.12, घसरण : 6.21%
-Avalanche – प्राइस: $92.76, घसरण : 6.04%
-BNB – प्राइस: $419.86, घसरण : 5.52%
-XRP – प्राइस: $0.821, घसरण : 4.91%
-Solana – SOL – प्राइस: $122.85, वाढ : +1.29%

सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Digital Fitness (DEFIT), BakeryToken (BAKE) आणि OneLedger (OLT) हे गेल्या 24 तासांत टॉप जंपर्समध्ये होते. Digital Fitness (DEFIT) 136.10% वाढला आहे, तर BakeryToken (BAKE) टोकन 86.13% पर्यंत वाढला आहे. या दोघांशिवाय तिसरे कॉईन OneLedger (OLT) आहे. यामध्ये 73.86 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment