नवी दिल्ली I आज क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये चांगली उसळी आली आहे. गुरुवारी सकाळी 10.32 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 4.72% ने वाढून $1.83 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. सोलाना आणि कार्डानो (ADA) यांच्याकडे लक्षणीय आघाडी आहे. आज असे एक क्रिप्टो कॉईन आहे, ज्याने 1000 टक्क्यांहून अधिकची उडी घेतली आहे.
Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ही बातमी लिहिताना, बिटकॉइन 4.81% वर $41,063.10 वर ट्रेड करत होता, तर Ethereum ची किंमत गेल्या 24 तासात 5.51% वर $2,765.00 वर होती. Bitcoin वर्चस्व आज 42.7% आहे. इथेरियमचे मार्केट वर्चस्व किंचित वाढून 18.2% झाले आहे.
कोणत्या कॉईन्समध्ये काय चालू आहे ?
-Avalanche – प्राइस: $76.14, वाढ : 10.77%
-Solana – SOL – प्राइस: $88.59, वाढ : 8.09%
-Cardano – ADA – प्राइस: $0.8537, वाढ : 7.12%
-Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1185, वाढ : 5.12%
-Shiba Inu – प्राइस: $0.00002266, वाढ : 4.40%
-XRP – प्राइस: $0.7944, घसरण : 4.32%
-BNB – प्राइस: $384.96, वाढ : 4.24%
-Terra – LUNA – प्राइस: $88.96, वाढ : 1.49%
सर्वाधिक वाढ झालेलं कॉईन्स
CatBoy, Egoras Credit (EGC), आणि FaithfulDoge (FDoge) हे गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेले तीन कॉईन्स आहेत. CatBoy कॉईन गेल्या 24 तासांत 1013.16% ने वाढले आहे, तर Egoras Credit (EGC) कॉईन 246.83% ने वाढले आहे. याशिवाय, FaithfulDoge (FDoge) मध्ये 240.27% ची उडी दिसून आली.