हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर महेंद्रसिंग धोनीला थेट गेल्या वर्षीच्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा मैदानात क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. आज सोमवारी धोनीने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सराव केला. धोनी तब्बल २६४ दिवसानंतर चेन्नईच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी उतरला होता.
आश्चर्यकारक बाब म्हणजे धोनी येणार आहे म्हणून चेपॉक स्टेडियममध्ये शेकडो लोक त्याची वाट पाहत होते. दरम्यान, धोनीने स्टेडियममध्ये प्रवेश करताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. या संपूर्ण प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शेकडो लोक धोनीचा सराव पाहण्यासाठी जमले असून त्यांच्यात त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड उत्साह आहे.
ROAR your whistles loud and clear????
Thala MS Dhoni is back in action after a long wait of 264 days!????????#WhistlePodu #Yellove @ChennaiIPL pic.twitter.com/jCuoKo6ca5
— Whistle Podu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) March 2, 2020
आईपीएल२०२०साठी चेन्नई सुपर किंगच्या सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी धोनीने काल रविवारी चेन्नईत पाऊल ठेवले. आज सोमवारी सकाळी धोनीने स्टेडियमवर सरावासाठी जाण्यासाठी जसे हॉटेल सोडले तेथून स्टेडियमपर्यंत त्याच्या बसचा बऱ्याच जणांनी पाठलाग केला. यावेळी धोनी आपल्या नेहमीच्या बसमधील सर्वात शेवटच्या कॉर्नर सीटवर बसलेला दिसला. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार म्हणून ३ वेळा आयपीएलचे चॅम्पियन बनविला आहे. आणि यावेळीसुद्धा संघाने विजेतेपद जिंकेल अशी चाहत्यांना आशा आहे.
First practice session of the season. Thala @msdhoni is back to his corner seat in the team bus!????????
Video Courtesy: @itsmadhu #WhistlePodu #Dhoni #IPL2020 pic.twitter.com/3M7d8zA9WF
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) March 2, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.