चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज करणार द्विशक ; घालणार मोठ्या विक्रमाला गवसणी

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा 13 व्या हंगाम खूपच रंगतदार होत असून अनेक सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. प्ले ऑफ च्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांचं स्थान निश्चित असलं तरी अन्य 2 जागांसाठी 6 संघामध्ये चुरस लागली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून पराभूत संघ प्ले ऑफ शर्यतीतून बाद होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावून आज मैदानावर उतरणार आहेत. आजच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इतिहास रचणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आज २००वा आयपीएल सामना खेळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा धोनी हा पहिलाच खेळाडू आहे. आयपीएल च्या पहिल्या पर्वा पासून धोनी चेन्नई सुपर किंग्स चा आधारस्तंभ राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावली आहेत.

महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील कामगिरी

महेंद्रसिंग धोनीने आत्तापर्यंत 199 सामने खेळले असून त्यात 41.52 च्या सरासरीने 4568 धावा काढल्या आहेत. यादरम्यान धोनीचा सर्वाधिक स्कोर 84 राहिला आहे. धोनीनं आत्तापर्यंत 23 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर 306 चौकार आणि 215 षटकार धोनीच्या नावावर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here