CSK Vs RCB Match। इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ची सुरुवात आजपासून होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलुरू असा हाय वोल्टेज सामना आज पाहायला मिळणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. महेंद्रसिंघ धोनी कर्णधापदावरून पायउतार झाल्यानंतर चेन्नईचा नवीन कर्णधार ऋतुराज गाईकवाड संघाचे नेतृत्व कस करतो ते आज पाहावं लागेल. दोन्ही संघाची तुलना करायची झाल्यास आरसीबीचा संघ कागदावर तरी काहीसा वरचड पाहायला मिळतो.
कोण मारणार बाजी – CSK Vs RCB Match
आरसीबीच्या संघात फाफ डुप्लेसी आणि विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला येईल. याशिवाय मुंबई इंडियन्स मधून घेतलेलया कॅमेरून ग्रीनमुळे बंगळुरूच्या फलंदाजीला आणखी बळ मिळालं आहे. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि मधल्या फळीतील रजत पाटीदार यांनाही आपला खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीचा विचार केला तर आरसीबीकडे आत्तापर्यंतचा सर्वोत्तम ताफा आहे असं म्हणावं लागेल. अलझारी जोसेफ, मोहम्मद सिराज, लोकी फर्ग्युसन, टॉम करण, ट्रोप्ले यांच्यामुळे बंगलुरूच्या गोलंदाजीला धार आली आहे. तर करण शर्मासारखा उच्च दर्जाचा फिरकीपटू आरसीबीकडे आहे. कर्णधार फाफ डुप्लेसीस परदेशी खेळाडूंची सांगड कशा पद्धतीने घालतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे महेंद्रसिंघ धोनीने स्वतःला कर्णधारपदावरुन पायउतार केल्याने स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला धक्का बसला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करेल. सलामीवीर डेवोन कॉन्वे दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे हि मराठमोळी जोडी चेन्नईच्या डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत राचीन रवींद्र, मोईन अली, डार्लि मिचेल आणि महेंद्रसिंघ धोनी जबाबदारी पार पडतील. अष्टपैलू रवींद्र जडेजा वर चेन्नईच्या चाहत्यांच्या नजरा असतील. चेन्नईकडे सुद्धा जलदगती गोलंदाजांचा ताफा आहे. दीपक चहर, मुस्तफिझूर रहमान, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी यांच्या गोलंदाजीचा सामना करताना आरसीबीला सुद्धा जपून खेळावं लागेल. तर चेन्नईकडे सुद्धा मिचेल संटनर सारखा जागतिक दर्जाचा फिरकीपटू आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने आयपीएलचा आजचा पहिला सामना (CSK Vs RCB Match) रंगतदार होणार यात काही शंका नाही.