नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील कामोठे या ठिकाणी एका तरुणाला हिरोगिरी चांगलीच महागात पडली आहे. यामध्ये ‘कामोठे मैं अपनाच राज चलेंगा’ म्हणत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी अटक करून चांगलीच अद्दल घडवली आहे.
'अपनाच राज चलेंगा' म्हणत तलवारीने कापला केक, मग काय पोलिसांनी भाईला जेलमध्ये टाकले थेट pic.twitter.com/gyY3zfg6eG
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 11, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम गजानन कांबळे असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी ओम कांबळेने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी भर रस्त्यावर तलवारीने केक कापला होता. हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात भादवि कलम 143, 144 सह भारतीय हत्यार अधिनियम कलम 4 व 25 अन्वये सहा ते सात जाणंविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कामोठे पोलीस स्टेशनमधून मुख्य प्रवेशद्वाराने एक इसम सिगारेट ओढत बाहेर पडत असताना चा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ओम कांबळेचा तलवारीने केक कापतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी ओम कांबळे ‘छोटे कामोठे में किधर भी जा अपना ही राज चलेगा, आखा कमोठा k60 के नाम से ही जलेगा’ असे म्हणत केक कापताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर पाच ते सहा मित्र सोबत होते. या प्रकरणी पोलिसांनी ओम कांबळे,अक्षय कांबळे,किशोर रणपिसे,सागर चंदनकर,कमलेश वरखडे व इतर अन्य आरोपी विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कामोठे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.