’12 कोटी द्या अन्यथा…’ हॅकर्सकडून संजीव बजाज यांना धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांना मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने संजीव बजाज यांच्याकडे 12 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. जर त्यांनी खंडणीची रक्कम दिली नाहीतर तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल. ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी धमकी हॅकर्सने दिली आहे. या ई मेल नंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाज फायनान्स कंपनीतर्फे युवराज मोरे यांनी हि तक्रार दाखल केली आहे.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांना [email protected] या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. या सायबर चोरट्यांकडून खंडणीची रक्कम DOGE COIN या क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून द्यावी, अशी मागणी केली आहे. या आरोपींनी 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये डोजे कॉइन ऍड्रेसवर पाठवण्यास सांगितले होते. हा धमकीचा मेल 28 नोव्हेंबर 2021 रोजी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

खंडणीसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर
डोजे कॉइन ही प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. हि परदेशातील दोन संगणक अभियत्यांनी बनवली आहे. या सायबर चोरटयांनी डोजे कॉइनच्या माध्यमातून 7395373 एवढ्या रकमेची मागणी केली आहे. हि रक्कम भारतीय चलनानुसार तब्बल 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये इतकी आहे. जर हि रक्कम लवकरात लवकर दिली नाहीतर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल, यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी धमकी या ई- मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.