सरकार विरोधात विरोधक आक्रमक; संसदेवर ‘सायकल रॅली’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात सर्व विरोधक एकटवले असून दिल्लीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढलेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५  विरोधी पक्षांची बैठक संपली असून आता सर्व खासदार सायकलवरून संसदेत जात आहेत.

पेगासस वरून देखील विरोधक आक्रमक झाले असून पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कडून केली जात आहे. सत्ताधारी भाजप आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढतानाच संसदेतही लढाई लढावी लागणार आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हंटल.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, जेएमएम, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि एलजेडी या बैठकीत सहभागी होत आहेत. यावेळी इंधन दरवाढीविरोधात एकता दाखवण्यासाठी राहुल गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी सायकल रॅली काढली.

Leave a Comment