पंतप्रधान मोदी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी पश्चिम बंगाल-ओडिशा दौऱ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले होते.

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रभावित क्षेत्राचा हवाई सर्व्हे करणार आहेत. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत ते एक बैठकदेखील करतील. त्यानंतर दुपारी १.३० मिनिटांनी ते ओडिशाकडे रवाना होतील. पश्चिम बंगालच्या दौऱ्या निमित्तानं पंतप्रधान मोदी तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीतून बाहेर पडले आहेत. याअगोदर पंतप्रधानांनी २९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज आणि चित्रकूट दौरा केला होता. दरम्यान, अम्फान महाचक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या तडाख्यात तब्बल ७२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केवळ कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment