हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हवामानात सतत बदल होत असतात. त्या बदलाच्या परिणामामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो. आता काहीसी अशीच स्थिती होते का असा प्रश्न पडला आहे. त्याच कारण बनलय मिधिली चक्रीवादळ. हे वादळ बांगलादेशच्या दिशेने हे वादळ सरकत असून काही राज्यांना याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.
उत्तर – पूर्व राज्यामध्ये होणार जोरदार पाऊस
बांगलादेशच्या दिशेने सरकत असलेल्या या चक्रीवादळामुळे उत्तर – पूर्व राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे छठपूजेवर वादळाचे सावट येते की काय? अशी भीती लागून आहे. तसेच चक्रीवादळ मिधिली आज बांगलादेशच्या ओलांडणार आहे. त्यामुळे मिझोराम राज्यात सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे.
किनारपट्टीपासून 40 किमी दूर आहे वादळ
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ सध्या किनारपट्टीपासून 40 किलोमीटर दूर आहे. बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे वादळ त्रिपुरा आणि बाजूच्या बांग्लादेशात, आगरतळ्यापासून 60 किमी आग्नेय-पूर्वेस, मजदीकोर्टच्या सुमारे 50 किमी उत्तर-पूर्वेस, खोल दाबामध्ये कमकुवत झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळ हे पुढच्या 24 तासांत बांगलादेश किनारपट्टी मोंगला आणि खेपुपारा दरम्यान ओलांडू शकते. त्यामुळे सगळीकडे अलर्ट जारी केला आहे. तसेच बचत कार्याचीही तयारी सुरु केली आहे.
तामिळनाडूत जोरदार पाऊस
एकीकडे चक्रीवादळाची भीती लागलेली असताना तामिळनाडूत पावसाने मानवी जीवन विस्कळीत केले आहे. दरम्यान, मिझोराममध्येही शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. IMD नुसार नागालँड, मणिपूर, आसाम आणि मेघालयमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. सध्या बिहारमध्ये छट पूजेची घाई सुरु असून त्यावर पावसाचे सावट येणार नाही कारण तेथे हवामान स्वच्छ राहण्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.