हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळने आता महाराष्ट्रातील सिधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवरून आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आले आहे. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसणार असल्याने प्रशासन सज्ज झालेलं आहे.
रायगड किनारपट्टीला रात्री उशिरा तौक्ते चक्रीवादळ धडकणार आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील 2254 लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरीत समुद्रकिनारी 90 किमीच्या वेगाने वारा
तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर वादळाचं रौद्ररुप बघायला मिळतंय. तसेच समुद्राच्या लाटाही उसळतानाही पहायला मिळाल्या. त्यामुळे समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी परिसरात ताशी 90 किमी वेगाने वारा वाहतोय. तौत्के वादळ आता गुजरातच्या दिशेला निघालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
गोव्यात दोघांचा मृत्यू
गोव्यात तौक्ते वादळामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. या वादळामुळे गोव्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.