कोल्हापूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्विकारले.
आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरील पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश चांगलाच चर्चाचा विषय बनला असून पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कोल्हापूर काँग्रेसमधे बेचैनी पसरली आहे. पाटील यांचे पुत्र सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे सतेज पाटील यांचे विरोधक आहेत. अशात मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्या पक्षात डॉ. पाटील यांनी प्रवेश केल्याने सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.
डी. वाय. पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. पाटील यांनी आजवर त्रिपुरा, बिहार आणि प. बंगाल अशा तीन राज्यांचे राज्यपाल म्हणुन पदभार सांभाळला आहे. २००९ ते २०१३ या काळात त्रिपुरा, तर २०१३ ते २०१४ या काळात ते बिहारचे राज्यपालही होते. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही कार्यभार त्यांनी काही काळासाठी आपल्या हाती घेतला होता.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ