हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार, असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
दाम्पत्याच्या हत्येमागे ‘हे’ आहे धक्कादायक कारण…
ताब्यात घेतलेल्या आरोपी दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार याच्या चौकशीत दाम्पत्याच्या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. यासंदर्भात दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीवर एक-दीड वर्षांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. खून झालेल्या दाम्पत्याच्या मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेचा राग मनात धरून तरूणाच्या संपूर्ण कुटुंबाला संपवणार असल्याचे आरोपी सतत बोलत होता. दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावरच संशय व्यक्त करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याने या गुन्ह्याची कबुली देखील दिली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2529428860557452
श्वान पथकास पाचारण…
आज सकाळी माण तालुक्यात आंधळी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पूर्ण सातारा जिल्हाच हादरून गेला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दहिवडीच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यसेच घटनेचा पंचनामा केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांनी आरोपीस ‘असे’ काढले शोधून
घटनेची माहिती मिळाल्यापासून दहिवडी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत त्याचा माग काढला. त्यानुसार पहिल्यांदा तो फलटण येथे असल्याचे समजले. मात्र, त्यानंतर तो फलटणहून येऊन आंधळी परिसरातच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार तासात एकास अटकही केली आहे. स्वतःचा सख्खा चुलत भाऊ आणि भावजय ही दहा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतात भिजवण्यासाठी गेले असता आरोपी बापूराव पवार याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांना ठार मारले.