हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठी भेट मिळणार आहे. EPFO च्या एका प्रस्तावित पेन्शन योजनेत असंघटित क्षेत्रातील मजुरांचाही समावेश केला जाऊ शकेल. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या पेन्शन योजनेची व्याप्ती वाढवन्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ही नवीन योजना वैयक्तिक योगदानावर आधारित प्रस्तावित आहे, ज्यामध्ये प्रत्येक कर्मचार्याला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा कमीत कमी 3,000 रुपये पेन्शन मिळेल.
या प्रस्तावित योजनेला युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असे नाव दिले जाऊ शकते. तसेच याचा उद्देश सध्याची कर्मचारी पेन्शन योजना (EPS), 1995 च्या विविध आव्हानांना तोंड देणे आहे. दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार्या कर्मचार्यांसाठी कोणतेही कव्हरेज उपलब्ध नाही, मात्र एक साधी पेन्शनची रक्कम प्रस्तावित आहे. EPFO
या नव्या योजनेत रिटायरमेंट पेन्शन, विधवा पेन्शन, मुलांचे पेन्शन आणि अपंगत्व पेन्शनची तरतूद असेल. मात्र, या पेन्शन लाभासाठी सेवेचा कमीत कमी पात्रता कालावधी 10 वरून 15 वर्षांपर्यंत वाढवला जाईल. जर एखाद्या सदस्याचा वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला युनिव्हर्सल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन दिली जाईल. EPFO
दरमहा कमीत कमी 3,000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी एकूण 5.4 लाख रुपये जमा करावे लागतील. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) कडून स्थापन करण्यात आलेल्या समितीने म्हटले आहे की,” EPFO सदस्य स्वेच्छेने जास्तीच्या योगदानाची निवड करू शकतात आणि जास्त पेन्शनसाठी मोठी रक्कम जमा करू शकतात. सध्या, 20 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपनीमध्ये दरमहा 15,000 रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या कामगारांसाठी EPF योगदान देणे अनिवार्य आहे. हे लक्षात घ्या कि, प्रत्येक कर्मचारी त्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम EPF योजनेमध्ये जमा करतो.
EPF मध्ये योगदान देणाऱ्या सर्वांसाठी EPS बंधनकारक आहे. नियोक्त्याचे 8.33% योगदान पेन्शन योजनेत जमा केले जाते. जे 15,000 रुपये प्रति महिना पगाराच्या मर्यादेवर आधारित 1,250 रुपये प्रति महिना असेल. EPFO
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज झाली वाढ, नवीन किंमत पहा
Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!
Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!
SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे