व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ने भारतातील डिजिटल पेमेंटना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल वॉलेटमुळे जलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय पेमेंट करता येते. मात्र कधीकधी सर्व्हरमधील अडचणींमुळे पेमेंट अडकले जाते. अशा परिस्थितीत UPI ID आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो. म्हणूनच आपण एकाच वेळी अनेक UPI ID वापरू शकतो.

Google Pay वर, युझर्सना त्‍यांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये जास्तीत जास्त चार UPI ID आणि एकाच बँकेशी संबंधित अनेक UPI ID लिंक करू शकतात. Google Pay मध्ये वेगवेगळ्या बँकांसह अतिरिक्त UPI ID असेल तर कोणत्याही अडचणी शिवाय पेमेंट करता येतात.

अशा प्रकारे करेल काम

कोणताही UPI आयडी उपलब्ध नसेल तर हे App पेमेंटसाठी पर्यायी मार्ग निवडेल. यासोबतच UPI ID हे देखील सुनिश्चित करतो की पेमेंट्स कोणत्याही विलंब किंवा अपयशाशिवाय सुरक्षितपणे केले जातात. यामध्ये युझर्सना त्यांच्या इच्छेनुसार कधीही हे ID डिलीट करता येतील.

Google Pay Has Found a Way to Make Indians Very Happy With Hinglish

Google Pay मध्ये UPI आयडी कसा लिंक करावा ???

Google Pay मध्ये UPI ID लिंक करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या Android किंवा iOS डिव्हाइसवर Google Pay App उघडा. आता App मध्ये साइन इन / लॉग इन करा. नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात, फोटोवर क्लिक करा. आता पेमेंट मोड निवडा. इथे नवीन UPI ​​ID साठी लिंक करायचे असलेले बँक खाते निवडा.

Google Pay is reportedly killing peer-to-peer payment facility on its web app from January 2021- Technology News, Firstpost

येथे ड्रॉप-डाउन ऑप्शनमधून ‘UPI ID मॅनेज करा’ हा पर्याय निवडा. आता नवीन UPI ​​आयडी जनरेट करण्यासाठी ‘+’ चिन्हावर टॅप करा. येथे ‘Choose an account to pay with’ मध्ये, पेमेंट करण्यासाठी वापरलेला UPI ID निवडा.

‘Add Now’ निवडल्यावर, Google Pay आपल्या वतीने अतिरिक्त UPI ID जनरेट करण्यासाठी SMS पाठवेल. यासाठी स्टॅंडर्ड SMS चार्जेस लागू होतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.nbu.paisa.user&hl=en_IN&gl=US

हे पण वाचा :

फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच

Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!

FD Rates : अल्पावधीत FD वर 7.5% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची लिस्ट पहा

SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे

Home : बुकिंग रद्द केल्यास घर खरेदीदारांना होणार नाही जास्त नुकसान, RERA ने बिल्डर्सना दिले ‘हे’ आदेश